सांगोला तालुकाशैक्षणिक

एनसीसी रायफल शूटिंग मध्ये पुन्हा एकदा विद्यामंदिर चा डंका 

सांगोला:- रायफल शूटिंग आणि सांगोला विद्यामंदिर सध्या हे एक समीकरणच बनलेला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या (नॅशनल लेवल) ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये महाराष्ट्र डायरेक्ट्रेट मध्ये रायफल शूटिंग साठी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील कॅडेट अमर भगवंत दिघे इयत्ता नववी व कार्पोरल राघव भारत हंबीरराव इयत्ता नववी या दोन विद्यार्थ्यांनी इंटर ग्रुप रायफल शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये अनुक्रमे गोल्ड मेडल व सिल्वर मेडल मिळवून पुन्हा एकदा सांगोला विद्यामंदिरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
औरंगाबाद येथे सुरू असलेल्या कॅम्पमध्ये औरंगाबाद , मुंबई ए,मुंबई बी ,नागपूर ,अमरावती, कोल्हापूर व पुणे ग्रुप मधील एनसीसी कॅडेट्स  रायफल शूटिंग साठी सहभागी झाले होते.  प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या विद्यार्थ्यांनी “हम भी किसीसे कम नही” दाखवत मागील वर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली . शूटिंग साठी या कॅडेट्सना एएनओ सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी सर व एएनओ थर्ड ऑफिसर उज्वला कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांना 38 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल राजेश गजराज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल विक्रम जाधव सर सुभेदार मेजर अरुण कुमार ठाकूर सुभेदार अण्णासाहेब वाघमारे हवालदार सुदाम या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके,  सचिव म शं घोंगडे,  सहसचिव प्रशुद्धचंद्र  झपके,  संस्था सदस्य विश्वेश झपके,  सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर घोंगडे,   मुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद,  सुपरवायझर पोपट केदार,  बिभीषण माने , अजय बारबोले  या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!