सांगोला तालुका

कोळा येथे दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालयास तहसीलदार खडतरे यांची सदिच्छा भेट..

सांगोला तालुक्यातील कोळ्या सारख्या ग्रामीण भागात संस्थापक दीपकराव माने यांनी शिक्षणासाठी गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनी साठी चांगले काम केले संस्थेला भेट देताना आनंद होत आहे त्यांनी शिक्षण क्षेत्रात अल्पवधीत काळामध्ये शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन कौतुकास्पद आदर्शवत शिक्षणाचे काम केले आहे असे विचार सांगोल्याचे तहसीलदार संजय खडतरे यांनी व्यक्त केले.
कोळा ता सांगोला येथे डॉक्टर पतंगराव कदम शिक्षण संस्थेचे दीपक आबा साळुंखे पाटील बीएससी बी ए जुनिअर कॉलेज व महाविद्यालयास तहसीलदार संजय खडतरे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सन्मानपूर्वक शाल श्रीफळ फेटा देऊन संस्थेचे संस्थापक दीपक राव माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी खडतरे बोलत होते.
यावेळी बोलताना तहसीलदार संजय खडतरे पुढे म्हणाले संस्थेच्या वतीने मान सन्मान देत सत्कार केला त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आपल्याला काय अडचणी शासकीय काय काम असेल तर कळवावे योग्य ते सहकार्य केले जाईल. संस्थेची मोठी इमारत पाहून मनस्वी आनंद झाला गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी एक उत्तम प्रकारे  शिक्षण देण्याची चांगली सोय केली संस्थापक दिपकराव माने यांनी केल्यामुळे समाधान वाटत आहे येणाऱ्या काळात शिक्षण संस्था नक्कीच मोठी उंची गाठेल संस्था गरुड भरारी घेईल असे तहसीलदार खडतरे यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थापक दीपकराव माने, पत्रकार जगदीश कुलकर्णी, सचिव अमोल माने,  संचालक शरद माने, तलाठी  योगेश बोदमवाड, संस्थेचे मार्गदर्शक  बाळासाहेब करांडे, प्राचार्य पी बी आलदर,  प्रा. निलेश मदने, प्रा.सोनवणे सर, प्रा.पुकळे सर, प्रा.मंडले सर, एनसीसीचे काशिलिंग होनमाने, प्रा. होवाळ सर, प्रा. तांबोळी सर, प्रा बिले मॅडम, प्रा. माने मॅडम, विश्र्वास कचरे, सेवक प्रथमेश हातेकर ,वंदना पोरे,हातेकर आदी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, कोळा पंचक्रोशीतील विविध मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संकेत जवळे सर आभार संस्थेचे संस्थापक दीपकराव माने यांनी मानले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!