घेरडीकर फडाचे मुळपुरूष सद्गुरू भोजलिंग महाराज यांचा पंचम पुण्यस्मरण सोहळा २१ ऑगस्ट रोजी घेरडी येथे होणार संपन्न.

सद्गुरू भोजलिंग महाराज घेरडीकर फड आयोजित, सद्गुरू भोजलिंग महाराज पंचम पुण्यस्मरण सोहळा व समाधी स्मारक प्रथम वर्धापन दिन श्रावण शुध्द पंचमी , सोमवार दिनांक – २१ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न होणार आहे.

त्यांनी महाराष्ट्रभर आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात वारकरी संप्रदायाचा निष्काम वृत्तीने प्रसार केला. हजारो लोकांना तुळशीमाळ घालून , वारकरी विचारांची व नितिमुल्यांची शिकवणं देऊन घेरडीकर फडाची स्थापना केली. त्यांच्या साजऱ्या होणाऱ्या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी हजारो लोकांचा जनसमुदाय वैराग्यभुमी, घेरडी येथे लोटणार आहे.

कार्यक्रम रूपरेषा-
सकाळी ०८ ते १० – सद्गुरू भोजलिंग महाराज पालखी नगर प्रदक्षिणा मार्ग – (भोसे कॉर्नर – कुंभारगल्ली – सुतार गल्ली – मारुती मंदिर – घेरडी गाव मुख्य प्रवेशद्वार – भोसे कॉर्नर) या मार्गावरून भव्य स्वरूपात निघणार आहे. सकाळी १०:३० ते १२:३० पुष्पवृष्टीचे कीर्तन ह.भ.प स्वप्निल महाराज घेरडीकर (सद्गुरू भोजलिंग महाराज वंशज) यांचे होईल. त्यानंतर दुपारी ०१ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. फडावरच्या सर्व गावातील वारकऱ्यांनी व समस्त भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button