मी सुखरुप आहे; काळजी करण्यासारखे कारण नाही- डॉ.अनिकेत देशमुख; डॉ.अनिकेत देशमुख यांनी घेतले अंबिकादेवीचे दर्शन

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोल्याचे शेकापचे नेते व स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांच्या वाहनाचा बुधवारी (16 ऑगस्ट) रोजी रात्री अपघात झाला. टेंभुणी-पंढरपूर या महामार्गावर गुरसाळे गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातातून डॉ.अनिकेत देशमुख हे बालबाल बचावले असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे. गुरुवारी (दि.18 ऑगस्ट) डॉ.अनिकेत देशमुख यांनी सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवीचेे दर्शन घेतले.यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ.अनिकेत देशमुख यांनी 2019 साली आम.शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणुक लढविली होती. त्यात त्याचा निसटता पराभव झाला होता.
डॉ.अनिकेत देशमुख यांचा पूणेहून पंढरपूर कडे येत असताना अपघात झाला. रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. परंतु, महाराष्ट्राचे आराध्यदैवत पांडुरग व सांगोल्याचे ग्रामदैवत अंबिकादेवीच्या कृपेने, स्व.आबासाहेबांच्या आशिर्वादाने व आपल्या सर्वांच्या सर्वांच्या सदिच्छेमुळे मी या अपघातातून सुखरुप बचावलो असून काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही. या दुर्दैवी अपघातातून परमेश्वराची कृपा, वाड वडिलांची पुण्याई, आई वडिलांचे आशीर्वाद, आणि आपणा सर्वांच्या सदिच्छासह कदाचित माझ्याकडून समाजाची आणखी सेवा करून घेण्याची परमेश्वराची इच्छा असावी.
या कठीण प्रसंगात राज्यासह तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील जेष्ठ-श्रेष्ठ, मायबाप, बंधू भगिनी,मित्र परिवार, नातेवाईक मंडळी फोन करुन विचारपूस करत आहे. तसेच मला धीर देत काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. त्यांचे आभार न मानता सर्वांच्या ऋणातच राहणं मी पसंत करेन. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच जास्त जोमाने उभा राहण्याची ताकद मला मिळाली असून या ताकदीच्या जोरावरच पुन्हा सामाजिक क्षेत्रात सक्रीय होत असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.