समूह नृत्य स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला प्रथम; कु.संध्या तेली उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ सांगोला व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय देशभक्तीपर गीत समूह नृत्य स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी गटामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेने उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच या संघाला नृत्य दिग्दर्शन करणाऱ्या प्रशालेतील सहशिक्षिका कु. संध्या तेली यांना उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिका म्हणून सन्मानित करण्यात आले.
सदर नृत्याच्या संघात प्रशालेतील इ.५ वी ते ७ वी मधील वैष्णवी तेली, समृद्धी माळी, अनुश्री महाजन, भक्ती तेली, आनंदी शिंदे, जान्हवी भगत, श्रावणी निंबाळकर, स्मिता पवार, सेजल होनराव, प्रीती डोळे, अस्मिता वाघमोडे, परिणिती माने, जीविका शिर्के, संध्या फासे, राधिका गोरे,संस्कृती सोंडकर, योगेश्वरी गुरव, रुचिता कदम व ऋतुजा माने यांनी सहभाग घेतला होता.
सदर विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व विद्यामंदिर परिवाराकडून संस्थाध्यक्ष मा.प्रबुद्धचंद्र झपके व सचिव मा.मल्लिकार्जुन घोंगडे यांचे शुभाहस्ते सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. यावेळी प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्या शहिदा सय्यद,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक बिभीषण माने, पोपट केदार,अजय बारबोले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांत रायचुरे व विभागातील सर्व शिक्षक उपस्थित होते. सदर नृत्याच्या यशस्वी सादरीकरणासाठी प्रा.इसाक मुल्ला,कविता राठोड, सुप्रिया ठाकर, महेश ढोले, सचिन बुंजकर, किशोर घोंगडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सर्व संस्था सदस्य तसेच प्रशालेतील सर्व प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.