जवान आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी 9 ऑगस्ट ला आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर धडक मोर्चा

सांगोला (प्रतिनिधी) भारतीय जवान किसान पार्टी व शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी व जवानांच्या विविध मागण्यासाठी क्रांती दिन नऊ ऑगस्ट रोजी पुणे आयुक्त कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सांगोला येथे माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना सांगितले.

नारायण अंकुशे म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळवून 76 वर्षे झाले मात्र अजून शेतकरी जवानांचे प्रश्न प्रलंबित आहे शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्च्या जीवावर राजकारण करून सत्तेचा उपभोग सर्वच राजकीय पक्षांनी घेतला. आमदार आणि खासदारांच्या पगार वाढीचे ,पेन्शन वाढीचे प्रश्न दोन मिनिटात सभागृहात सोडवले जातात पण शेतकऱ्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना सत्ताधारी व विरोधकांना वेळ नाही.निवडणूक आल्या की शेतकरी सैनिक वारकरी लाडका भाऊ आणि लाडके बहीण आठवतंय. दुधाला, उसाला, इतर पिकांना हमीभाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि युवकांना रोजगार देण्यासाठी शहिदांना त्यांचा हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी सरकार विरोधात पुणे विधान भवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे .

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील म्हणाले कारगिल युद्धाच्या 25 वर्षे होत असताना शहीद झालेल्या कुटुंबांना न्याय मिळालेला नाही स्वातंत्र्यानंतर 76 वर्षाने शेतकरी आणि सैनिकांचे एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला 25 हजार पेन्शन द्यावी शेतमालावरील निर्यात बंदी रद्द करा आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब साळुंखे, सचिव नरेश बाबर, सहसचिव उत्तम चौगुले, खजिनदार आनंदा व्हटे,  रेवणसिद्ध पाटील आणि भाऊ निमग्रे आदी सैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button