श्री चौंडेश्वरी महिला योगवर्गात होम हवन करून गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी.

सांगोला शहरातील श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी गल्ली सांगोला येथे गेली पंधरा वर्ष झाली नियमित महिला योग वर्ग नि:शुल्क घेण्यात येतो. दर वर्षी प्रमाणे याही वर्षी श्री चौंडेश्वरी महिला योगवर्गामधे गुरूपौर्णिमेनिमित्त होम हवन करून गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम होमकुंडाचे पूजन योगशिक्षिका सौ.मंगलताई लाटणे यांनी केले. त्या नंतर मा.योगगुरू श्री रामदेवजी महाराज यांना व आचार्य बालकृष्ण महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करून होम हवन करण्यास सुरुवात केली. सुरवातीला गायत्री मंत्र, व महा मृत्युंजय मंत्र म्हणून होमामधे आहुती दिली.सर्व महिला सदस्यांनी पण होमाचे पूजन करून मंत्र म्हणत आहुती दिली. त्या नंतर मंगल लाटणे यांनी आपल्या जीवनात गुरुंचे स्थान किती महत्वाचे आहे. हे सांगीतले. त्याच बरोबर नियमितपणे योगा प्राणायाम केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. आणि आरोग्य चांगले असेल तरच आपण आपले काम व्यवस्थितरित्या करू शकू असेही सांगीतले. योगा केल्यानंतर कोणते फायदे होतात,व त्याचे महत्त्व सांगीतले.
यावेळी अरूणा घोंगडे, मृदुला देशपांडे, सविता देशपांडे, वंदना महिमकर, अंकिता आणेकर, संगीता चौगुले, सुजादबी मेणेरी, साधना कुलकर्णी, स्वाती ठोंबरे, शोभा आवटे. इत्यादी सदस्या हजर होत्या.शेवटी प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.