educational

मंथन स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ

उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे पार पडणार हा सोहळा:-

HTML img Tag Simply Easy Learning    

 

मंथन वेल्फेअर अहमदनगर संचलित मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेण्यात येते. फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सांगोला तालुक्यातील १ली. ते ८वी. या स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी सकाळी १०वा. उत्कर्ष प्राथमिक विद्यालय जुना आलेगाव रोड सांगोला येथे पार पडणार असल्याची माहिती स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक समाधान केदार यांनी दिली आहे.

हा बक्षीस वितरण सोहळा सुयोग नवले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सांगोला यांच्या अध्यक्षतेखाली, टी.व्ही. जाधवर वनपरिक्षेत्र सांगोला यांच्या शुभहस्ते तर राजेंद्र यादव आपुलकी प्रतिष्ठान सांगोला, अशोक नवले संचालक सिंहगड कॅम्पस कमलापूर, सिध्देश्वर झाडबुके सानेगुरुजी कथामाला, वैजिनाथकाका घोंगडे माणगंगा भ्रमण संस्था सांगोला, उत्तम बेहरे अध्यक्ष विज्ञान अध्यापक मंडळ सांगोला, अमोल भंडारी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सांगोला व निलीमा कुलकर्णी सचिव माता बालक उत्कर्ष सांगोला या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

या सन्मान सोहळ्यात सांगोला, कमलापूर, महूद, वाकी, लोटेवाडी या केंद्रातील केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेल्या विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानित केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी मंथन बुक स्टॉल सांगोला व तालुका स्पर्धा परीक्षा समन्वयक समाधान केदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!