डॉ.अश्विनी केदार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

सांगोला(प्रतिनिधी):-डॉ.अश्विनी केदार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व शालेय मुलांना शालेय उपयोगी साहित्य वाटून तसेच खाऊ देऊन काल गुरुवार दि.25 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ.अश्विनी केदार यांच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठान व मातोश्री परिवार आयोजीत रक्तदान शिबीरामध्ये 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच बाबर सप्ताह मळ्यातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे आणि खाऊ वाटप करण्यात आले.रक्तदान शिबीराप्रसंगी शहर, परिसर व तालुक्यातील नागरिकांनी भेटी देवून रक्तदान शिबीर आयोजीत केल्याबद्दल कौतुक केले. सर्वांचे स्वागत अरविंदभाऊ केदार यांनी केले.
सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबवित केदार कुटुंबीयांनी डॉ.अश्विनी यांचा वाढदिवस साजरा करुन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.