असमा सय्यद आतार यांचे अल्पशा आजाराने निधन

सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला येथील रहिवाशी व सलीम मसाला या दुकानाचे मालक सय्यद आतार यांच्या पत्नी असमा सय्यद आतार (वय 32) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात पती, 3 मुली असा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शुक्रवार दि. 26 रोजी सकाळी 8 वाजता वाढेगाव रोडवरील मुस्लिम स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.



