सांगोला तालुका

लोकांशी जोडलेली नाळ अनिल दिघे यांच्या उद्योगक्षेत्रात निश्चितपणे कामाला येईल- मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

अनिल दिघे व दिपक पोरे यांनी नव्याने सुरू केलेल्या ट्रॅक्टर शोरूम चा उदघाटन सोहळा संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-राजकारण- समाजकारणाची सांगड घालून लोकांशी जोडलेली नाळ उद्योगक्षेत्रात निश्चितपणे कामाला येईल आणि प्रामाणिकपणे सुरू केलेल्या उद्योग व्यवसायाला निश्चितपणे चालना मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
वाढेगाव ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच अनिल दिघे यांनी नव्याने सुरू केलेल्या ट्रॅक्टर शोरूम चा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी शुभेच्छा देताना मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते.
पुढे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, आज अनिल आणि दिपक यांच्यासह माझे अनेक कार्यकर्ता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये यशाची शिखरे गाठत आहे. जसं जसं मिळेल तसं तसं कष्ट करण्याची तयारी आपल्या सांगोलाकरांची आहे. आणि त्यामध्ये आपल्या सांगोल्याच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी हा ट्रॅक्टरचा व्यवसाय सुरू होत आहे. शेतकर्‍यांच्या सेवेमध्ये हे दालन सुरू होत आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त करून नव्याने सुरू केलेल्या अनिल दिघे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, एकविसाव्या शतकामध्ये आधुनिक शेती करण्यासाठी महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर आहे. अनिल दिघे यांनी अनेक व्यवसाय केले त्या प्रत्येक व्यवसायामध्ये त्यांना यश मिळाले आहे. हे शोरूम सुरू करण्यासाठी अभिजीत पाटील यांनी अनिल दिघे यांना सहकार्य केलं आहे. भविष्यकाळात अनिल दिघे यांना आपले सहकार्य लाभाव व अनिल दिघे यांनी यशाची शिखरे गाठावी अशा शुभेच्छा डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिल्या.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी ट्रॅक्टर व अवजारे शेतकर्‍याच्या दारामध्ये पोहोचवणे गरजेचे आहे. शेतकर्‍याला योग्य सर्विस दिली तर ट्रॅक्टर विकला जातो ट्रॅक्टर घेण्यासाठी एखाद्या शेतकर्‍याकडे कमी पैसे असतील तर त्या शेतकर्‍याच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. असे सांगत त्यांनी अनिल दिघे यांच्या शोरूमला शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मा.जि.प. सदस्य सचिन देशमुख म्हणाले, टेंभू म्हैसाळ उजनीचे पाणी तालुक्याला येऊ लागले आहे. कारखाना चालू आहे आता शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे आधुनिक शेती करायची झाली तर ट्रॅक्टर सारखे यंत्र पाहिजे आणि ते यंत्र आपल्या दारात असायला पाहिजे. याचं स्वप्न अनिल दिघे यांच्या रूपाने पूर्ण होत असून  हे शोरूम अतिशय चांगले चालेल अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, युवक तालुकाध्यक्ष अनिल नाना खटकाळे,  सरपंच नंदकुमार दिघे, अरविंदभाऊ केदार व सांगोला शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!