भाग्योदय अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न; दिवाळी भेटवस्तू वाटपास प्रारंभ

सांगोला(प्रतिनिधी):-भाग्योदय अर्बन बँके च्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटपाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाटन शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आल. यावेळी बँकेचे चेअरमन श्री.हरी मेटकरी सर, व्हा.चेअरमन श्री. पांडुरंग देशमुख तसेच सीए तुषार ढेरे व संचालक आदम मुलाणी, बंडोपंत वाघमोडे, कामाजी नायकुडे, जालिंदर पारसे, पोपट जानकर, सौ.भारती वाघमोडे, श्रीमती संगीता बंडगर, हरिदास येडगे उपस्थित होते

 

रक्तदान शिबीरामध्ये बँकेच्या सभासदांसह नागरिकांनी सामाजिक भावनेतून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. डॉ.प्रभाकर माळी यांनी संस्थेच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त करुन रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. तसेच आरोग्या विषयी व रक्तदानाचे थोडक्यात महत्व सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बँकेचे मार्गदर्शक दगडू वाघमोडे गुरुजी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांनी मोलाचे परिश्रम घतेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button