न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राध्यापक, डॉ. अशोक शिंदे यांना विश्व मानवाधिकार कडून डॉक्टररेट………..

भारतातील 70 टक्के लोक शेती करत असून, सातत्याने शेतमालाच्या दरामुळे शेती अडचणीत सापडत आहे. एकीकडे भारतीय लोकसंख्येला खाऊ घालण्याचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे उत्पादन वाढीच्या प्रयत्नात रसायनांचा माती व पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होत असून, मानवी शरीरात आहाराद्वारे येणाऱ्या विषारी रसायनांचे प्रमाण वाढत आहे. यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी प्रा. डॉ.अशोक शिंदे प्रयत्न करीत आहेत. यावर उपाय म्हणून त्यांनी “संजीवन कृषी चिकित्सा प्रणाली” तयार केली आहे. या प्रणालीमध्ये रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशकांशिवाय सेंद्रिय रसायने व जैव मिश्रणातून कीटक, बुरशी, जिवाणू व विषाणूंना मारण्याची संकल्पना त्यांनी पुढे आणली आहे. यापूर्वी विषमुक्त फळे, भाज्या व अन्नधान्य उत्पादनावर त्यांनी संशोधन केलेले आहे. त्यांच्या शेतीविषयक कार्याची व संशोधनाची दखल घेत विश्व मानवाधिकार आयोगाने प्रा. डॉ. अशोक शिंदे यांना डॉक्टरेट देऊन सन्मानित केले.
तसेच त्यांना विश्व मानवी अधिकार आयोगाचे राष्ट्रीय सदस्यत्व बहाल करण्यात आलेले आहे.प्रा. डॉ.अशोक शिंदे यांना विश्व मानवाधिकार आयोगाकडून, मा. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन जी, केंद्रीय मंत्री दुष्यंत कुमार गौतम, ब्रिजमोहन जी, माननीय डॉक्टर तफन कुमार- अध्यक्ष विश्व मानवाधिकार आयोग, सिने अभिनेते गोविंदा त्याचबरोबर माजी क्रिकेटपटू मदनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत शेती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय संशोधन व कार्याबद्दल दिल्ली येथील द अशोक इंटरनॅशनल येथे डॉक्टरेट प्रधान करण्यात आली. मानवाधिकार आयोगामध्ये मानवी अधिकाराचे संरक्षण करणाऱ्या आणि सामाजिक विषयावर सक्रियपणे जागृती करणाऱ्या व्यक्तीला सन्मानित केले जाते. त्यांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.