सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरमध्ये इयत्ता अकरावी पालक- शिक्षक सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे इयत्ता अकरावी कला , वाणिज्य व शास्त्र शाखा पालक- शिक्षक सभा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा.शिवशंकर तटाळे यांनी शैक्षणिक वर्ष  २०२३-२४ ते २०२४-२५ या वर्षाकरिता पालक –  शिक्षक संघाची घोषणा केली. त्यामध्ये  अध्यक्षपदी  प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपाध्यक्षपदी शहिदा सय्यद मॅडम, प्रकाश निमग्रे, सचिवपदी प्रा.प्रल्हाद  कांबळे, सहसचिवपदी चंद्रशेखर गडहिरे , सदस्यपदी शरद शिंदे, कल्याण नलवडे, माधवी गायकवाड, रुकसाना शेख ,मनिषा हुंडेकरी ,सिमा गोजांरी , नवनाथ शेंडगे, बंडोपंत पवार , सिद्धेश्वर स्वामी यांची निवड झाली.  त्यानंतर प्रा.मिलिंद देशमुख यांनी सांगोला विद्यामंदिर येथील  विविध उपक्रम, विद्यार्थ्यांंचा गुणवत्तेसाठी केले जाणारे प्रयत्न याची  माहिती दिली. यावेळी नवनाथ शेंडगे, बंडू घाडगे,माधवी गायकवाड मॅडम, रुकसाना शेख या पालकांनी मनोगते व्यक्त केली व त्यामध्ये विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजबद्दल गौरव उद्गार काढले.
  या सभेमध्ये उपप्राचार्य शहिदा सय्यद यांनी आपल्या मनोगतात पालकांच्या शंका व सूचना संदर्भात माहिती दिली.अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य  गंगाधर घोंगडे यांनी  विद्यार्थी हीत  डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सांगोला विद्यामंदिर नेहमीच तत्पर आहे. असे  सांगितले.
     या सभेसाठी सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे अध्यापक,पालक    मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सौ.आरती वेदपाठक यांनी  तर आभार प्रदर्शन प्रा कु.गीतांजली साखरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!