कै.आ. काकासाहेब साळुंखे पाटील महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात संपन्न.

जवळे(प्रशांत चव्हाण):- विद्या विकास मंडळ जवळे संचलित कै. आ.काकासाहेब साळुंखे-पाटील कला व विज्ञान महाविद्यालय जवळे ता. सांगोला महाविद्यालयाच्या मौजे(वाकी)घेरडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्रा.डॉ. संजय मुजमुले हे होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.संजय मुजमुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाची ध्येय व उद्दिष्टे व त्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक जीवनामध्ये कधीच अपयशी होत नाही त्याच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी आणि समाजाविषयी आपुलकीची भावना निर्माण होते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून श्री.आनंदराव साळुंखे व कार्यक्रमाधिकारी प्रा.गेजगे सर हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.गेजगे यांनी करून 24 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 या सात दिवसांमध्ये वाकी(घेरडी) गावामध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिर अंतर्गत केलेल्या कामाची माहिती दिली.
तसेच गावातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि वाकी गावातील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अनुराधा नवले या विद्यार्थिनीने केलं तर या कार्यक्रमाचे आभार एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी दिगंबर ठोकळे याने मानले.