आ. गोपीचंद पडळकर यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या कमलापूर येथे रास्ता रोको

सांगोला(प्रतिनिधी):- धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी कार्यकर्त्यांकडून उद्या बुधवार दि.13 डिसेंबर रोजी सोलापूर- कोल्हापूर हायवे रस्त्याला कमलापूर ता-सांगोला, जि-सोलापूर या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.
आ. गोपीचंद पडळकर यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको संदर्भात सोमवार दि.11 डिसेंबर रोजी तहसीलदार सांगोला यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक 09/12/2023 रोजी इंदापूर या ठिकाणी झालेली सभा करून इंदापूर या ठिकाणी शेतकरी बांधवानी दूध दर वाढीसाठी उपोषण करणार्या कार्यकत्यांना भेटण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी आ. गोपीचंद पडळकर यांच्यावरती भ्याड हल्ला केला आहे. त्या निषेधार्थ दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी सोलापूर- कोल्हापूर हायवे रस्त्याला कमलापूर ता-सांगोला, जि-सोलापूर या ठिकाणी सकल ओबीसी समाज्याच्यावतीने रास्ता रोको करण्याचे आहे तरी सदर रस्ता रोको आंदोलनासाठी परवानगी मिळावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी उल्हास धायगुडे-पाटील, किरण(भाऊ)पांढरे, प्रशांत वलेकर, धनंजय मस्के, गोरख पांढरे, सतिश मोटे, आनंदा तंडे, तातोबा पांढरे, आकाश झुरळे, तानाजी पुजारी, श्रेयश कारंडे, निलेश कांबळे, प्रसाद खांडेकर, सत्यवान गडदे, रघुनाथ ऐवळे, राजेंद्र मागाडे, एन.जे.उबाळे, धर्मराज टकले, नारायण आलदर, विकास चौगुले, अनिल भंडारे, प्रकाश आळतेकर, यांच्यासह ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.