आरोग्य

सांगोला तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखा…अन्यथा उपोषणाचा इशारा

सांगोला(प्रतिनिधी):- मा.तहसिलदार यांना गौण खनिज वाळू तस्कर चालू आहे अशी मोबाईल व्दारे तक्रार केली असता, या उलट वाळू वाल्यांना मी तक्रार करत आहे असे सांगून कमलापूर गावातील गावगुंड अंगावर सोडले असून अवैध वाळू वाहतूक दारावर कारवाई करावी व या वाहतूकदारापासून माझ्या जीवनात धोका निर्माण झालेला आहे माझ्या जीवनात काही बरे वाईट झाल्यास तहसीलदार, वसुलदार व अवैध वाळू वाहतूकदार यांना जबाबदार धरावे. सदरच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन मला न्याय मिळावा अन्यथा 26 जानेवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एकनाथ शेंबडे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

मा.तहसिलदार यांना गौण खनिज वाळू तस्कर चालू आहे. मोबाईल व्दारे तक्रार केली असता,या उलट वाळू वाल्यांना मी तक्रार करत आहे असे सांगून कमलापूर या गावातील गावगुंड अंगावर सोडले असुन सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन मला न्याय मिळावा याबाबतचे निवेदन एकनाथ शेंबडे यांनी पोलीस निरीक्षक व तहसीलदार सांगोला यांना दिले आहे.

 

तालुक्यात व कमलापूर या गावांमध्ये प्रचंड अशा प्रमाणात अवैध वाळूचा उपसा रात्रंदिवस सुरू असून,या वाळवाल्यांशी संबंधित अधिकार्‍यांचे हात मिळवणी एका झिरो वसुलदारामार्फत एका वाहनाला मंथली लाखो रुपये घेऊन वाळू उपसा सुरू आहे.या वाहतुकीमुळे नदी परिसरातील लोकांना रात्रभर झोप लागत नाही याबाबत संबंधित तहसीलदार यांना मोबाईल वरती संपर्क साधून त्यांच्याकडे तक्रार केली असता मी परत तक्रार करू नये.म्हणून माझ्यावरच पंचनामा करून तुझ्या उतार्‍यावरच बोजा चढवतो. म्हणून दमबाजी केली. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न करता त्यांना झिरो वसुलदारामार्फत सावध करून सदरचे वाहने बंद करायला लावतात.

 

याबाबत वारंवार प्रयत्न करूनही अवैध वाळू वाहतूक दारावर कोणतीही कारवाई केली जात नाही.उलट तक्रारदारावरच पंचनामा करून तक्रारदाराच्या उतार्‍यावरच बोजा चढवण्याची धमकी तहसीलदाराकडून देण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता तहसीलदारांनी झिरो वसुंलदाराला माझे नाव सांगून माझी माहिती देऊन भडकवण्याचा प्रकार केलेला आहे त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.

तरी या अवैध वाळू वाहतूक दारावर कारवाई करावी व या वाहतूकदारापासून माझ्या जीवनात धोका निर्माण झालेला आहे माझ्या जीवनात काही बरे वाईट झाल्यास तहसीलदार व वसुलदार व अवैध वाळू वाहतूकदार यांना जबाबदार धरावे. सदरच्या प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन मला न्याय मिळावा अन्यथा 26 जानेवारी पासून आमरण उपोषणाचा करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!