विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याशी अरविंद वलेकर यांची विविध विषयावर सविस्तर चर्चा

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या दालनामध्ये सांगोल्याच्या अरविंद आण्णासाहेब वलेकर(विशेष समाज कल्याण परिषद, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांनी भेट घेऊन सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या शेतकरी,कष्टकरी,शेतमजूर यांच्या हिताचे असे दूध दरवाढीच्या आंदोलनासंदर्भात, तसेच आज सर्व समाज बांधवांनी नागपूर विधिमंडळावरती काढलेल्या धनगर आरक्षणाच्या एसटी प्रवर्गातील अंमलबजावणीसाठीचे आंदोलन तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून पुण्यात आलेले विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, महाज्योती या सर्व प्रश्नावरती सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मुख्यमंत्री असताना स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी सर्व समस्या समजून घेऊन यावरती प्रशासकीय स्तरावरती सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.