सांगोला तालुकाशैक्षणिक

शिक्षणातून समाज परिवर्तन शक्य -उद्योजक श्री.अशोक (भाऊ) आदलिंगे; स्वातंत्र्य दिनानिमित्त कमलापूर येथे २०० विद्यार्थ्यांना शालेय बॅगेचे मोफत वाटप

कमलापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक कमलापूर शाळेतील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना  कमलापूर गावचे सुपुत्र पुणे येथे श्री.अशोका वॉटरप्रूफिंग कंपनी व्यावसायिक म्हणून नावारूपास आलेले उद्योजक अशोक आदलिंगे समाजाप्रती असलेली भावना व सामाजिक भावनेने प्रेरित होऊन शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.
श्री.अशोक आदलिंगे यांची परिस्थिती अतिशय बेताची व हलाखीची आदलिंगे साहेबांनी जिद्द सोडली नाही. आपल्या व्यवसायाच्या जोरावर पुणे येथे अनेक लोकांना रोजगार देण्याचे काम केले आहे. जरी पुणे येथे कार्यरत असले तरी मातीमध्ये आपला जन्म झाला गावामध्ये आपला जन्म झाला त्या गावावरील प्रेम  व आपुलकी तसुभरही सुद्धा कमी झाली नाही. समाजातील गोरगरीब कष्टकरी सामान्य वर्गातील शेतकऱ्यांची मुले शिकले पाहिजेत. प्रामाणिक भावना अशोक भाऊ आदलिंगे यांची आहे. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर जिल्हा परिषद प्राथमिक उपकेंद्र शाळा आदलिंगे- श्रीराम वस्ती येथील गरजूवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅगचे वितरण डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदतीचा हात देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समाजसेवेचे प्रेम असणाऱ्या लोकांनी अशा विद्यार्थ्यांना मदत केल्यास निश्चितपणे सामाजिक दरी कमी होईल.समाज बलवान होईल. यावेळी उद्योजक श्री अशोक आदलिंगे यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांनी मोफत साहित्य वाटपाचे आदर्श घेण्याजोगे आहे. शेवटी देशमुख यांनी सांगितले.
यावेळी कमलापूर गावच्या सरपंच सौ. कलावती बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच देविदास ढोले, महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे संचालक बाबुराव(बी.आर) बंडगर, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विजय अनुसे, ग्रामसेविका शुभांगी गवंड, कमलापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बशीर मुलाणी, इ.सर्व शिक्षक तंटामुक्तीचे उपाध्यक्ष सोमनाथ (अण्णा) अनुसे,ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब अनुसे, नितीन काळे, मधुकर तंडे,अनिल पडवळे , नवनाथ पडवळे, विजय देवकते, सदाशिव दगडू अनुसे, संदिपान गडदे,लहू चव्हाण, रघु ऐवळे, मंडळी उपस्थित होती.कमलापूर पंचक्रोशीतील असंख्य लोक उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते अशोका वॉटरप्रूफ कंपनीचे सर्वेसर्वा अशोक भाऊ आदलिंगे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कमलापूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!