शिवणे विद्यालयात आम्ही वैज्ञानिक बनणार या विषयावर ज्येष्ठ वैज्ञानिक व्ही.बी.रायगावकर यांचे व्याख्यान संपन्न

शिवणे (वार्ताहर)-शिवणे माध्यमिक विद्यालय शिवणे येथे नेहरू विज्ञान केंद्र,मुंबई (भारत सरकार) येथील निवृत्त शिक्षणाधिकारी ,जेष्ठ वैज्ञानिक श्री.व्ही.बी.रायगावकर यांचे “आम्ही वैज्ञानिक बनणार” या विषयावर व्याख्यान झाले.त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य विजयकुमार वाघमोडे हे होते.सुरवातीला प्रमुख वक्ते व्ही.बी.रायगावकर यांचा फेटा,शाल व पुष्पहार घालून सपत्नीक सत्कार करण्यात आला व्ही.बी.रायगावकर हे प्रशाला सुपरवायझर हेमंत रायगावकर यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
आपल्या ओघवत्या शैलीत महिती देताना अनेक गोष्टी सांगितल्या व त्यांनी अनेक छोटे -छोटे प्रयोग करून दाखविले.
विध्यार्थी दशेतच आपली विशेष तार छेडली तर आपल्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज, अब्दुल कलाम,सचिन तेंडुलकर,माशेलकर, तयार होतील यासाठी बुद्धीची एकाग्रता करून आपल्या शरीरातील पेशींवर कंट्रोल ठेऊन विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून शिक्षण घेतले पाहिजे असे विचार मांडले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की,सध्याच्या काळातील सोशल माध्यमाचा अतिरेक वापर न करता मुलांनी वाचन करणे, प्रयोग करणे याकडे लक्ष दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत नरळे यांनी केले सदर कार्यक्रमास सर्व विध्यार्थी,शिक्षक स्टाफ उपस्थित होता.