मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मोर्चावरली लाठी हल्ला हा निंदनीय –डॉ. भाई बाबासाहेब देशमुख‌

    शुक्रवारी जालना येथील पैठण फाटा येथे मराठा आरक्षणासाठी निघालेल्या जन आक्रोश आंदोलनावरील भ्याड लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी जाहीर निषेध केला ..
  जालना,बिड, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील १२३ गावातील मराठा बांधवांनी मराठा आरक्षणासाठी शांततेने जन आक्रोश आंदोलन केले असताना आंदोलनातील सहभागी नागरीकांवरती पोलीसांनी अमानुष पणे लाठी हल्ला केला.. त्यामध्ये कित्येक नागरीक गंभीर जखमी झाले आहेत.. आंदोलनामध्ये सहभागी महिलावरती सुध्दा निर्दय पणे लाठीहल्ला करण्यात आला आहे त्या लाठीहल्लयात अनेक‌ महिला गंभिर जखमी झाल्या आहेत..
   महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने ५८ जन आक्रोश मोर्चे काढले ते ही अगदी शांततेच्या मार्गाने..एकदाही अनुचीत प्रकार घडु दिला नाही..आशा मोर्चाची दखल देश विदेशातील वर्तमान पत्राने घेतली होती…तरीही शांतताप्रिय असलेल्या समाज बांधवांवरती असा अमानुष लाठी हल्ला करणे योग्य नाही..
  मराठा आरक्षण ,धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण किंवा इतर आरक्षणे देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची संमती दर्शवली आहे..आसे असताना घोडे कुठे पेंड खाते हे ही पाहीले पाहिजे.जे पक्ष विरोधात असतात तेंव्हा आरक्षणासाठी आंदोलने करतात व सत्तेत आले कि.. कायद्याची भा षा करतात..भले आरक्षण हे कायदेशीर मान्यतेशिवाय मिळणारच नाही तर मग राजकारण करीत असताना कशाला खोटी आश्वासने दिली जात असतात.. फक्त मतासाठीच ना..अहो जनतेसमोर भाषणे ठोकत असताना तुंम्ही आंम्ही सत्तेवरील आलो की लगेचच आरक्षण देणार आशी आश्वासने देतात भाषणे‌ ठोकता मग आरक्षण का देत नाही हा सवाल सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उपस्थित होताना दिसत आहे.
   आरक्षण हा सध्या न्यायालयीन कचाट्यात सापडलेला विषय आहे..हे आपणास माहीत आसतान आरक्षणा बाबत आश्वासने का देता त्या साठी आपण वेगळा अध्यादेश काढावा व समाजाला आरक्षणे मिळवुन दयावीत उगीचच लोकांची फसगत करु नये व आरक्षण हा राजकीय विषय होऊ देऊ नये तो एक सामाजीक प्रगतीचा विषय आहे त्याकडे गांभीर्याने पहावुन सरकारने  मार्ग काढला पाहिजे.मार्ग काढण्याचे तर सोडाच परंतु जे समाजबांधव आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आरक्षण मिळावे यासाठी शांतता पुर्ण रितीने आंदोलन करीत असतील तर त्यात गैर काय आहे..तो त्यांचा लोकशाहीने दिलेला हक्क आहे.लोकशाहीमध्ये मतदानाच्या माध्यमातून निवडुन दिलेले लोकप्रतिनीधी जनतेचे प्रश्न सोडवत नसतील ..जनतेच्या प्रश्नांकडे कानाडोळा करीत असतील तर  संविधानामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही मार्गाने ,शांततेने आंदोलन करण्याचा हक्क प्रस्थापित करुन ठेवला आहे त्यांच्याच  आधारे मारठा समाजबांधवानी आरक्षणासाठी जन आक्रोश आंदोलन जालना येथे केले होते…ते आंदोलन सुध्दा हिटलरी पध्दतीने मोडुन काढण्यासाठी अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आला आहे..
   येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाच्या रास्त मागणीसाठी मग तो मराठा समाज असो,ओबीसी समाज असो, मुस्लिम समाज असो की दलीत समाज असो.. यांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना खंबीरपणे पाठीशी राहील… येत्या काळात विविध समाजाच्या आरक्षणासाठी आंम्ही रस्त्यावरची  लढाई अगदी तिव्र कराणार असल्याचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी सांगीतल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button