सांगोला तालुका

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे शुक्रवारी वितरण ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे शुक्रवारी वितरण

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभहस्ते

सोलापूर- जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करणेत आले आहेत. जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि. 8 सप्टेबंर रोजी होणार असल्याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण राजेयाचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार अरूण लाड, आमदार जयंत आसगावकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनदादा शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील , आमदार राजेंद्र राऊत, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली- उगले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार वितरण होणार आहे.

जिल्ह्यातील एकुण २४ शिक्षकांना पुरस्कार जाहिर झाले आहेत.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणा विभागाचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक चे शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी योजना सुलभा वठारे यांनी केले आहे.

तालुका निहाय शिक्षकांची यादी पुढील प्रमाणे असून सर्वसाधारण गटात श्रीमती करूणा विजयकुमार गुरव, शाळा मिरजगी ता अक्कलकोट, श्रीमती संगिता विश्वनाथ बांगर, शाळा गाताचीवाडी बार्शी, प्रफुल बाबासाहेब सातपुते, शाळा वेद वस्ती देवळाली करमाळा, श्रीमती प्रतिभा सुभाष नवले, केदारवस्ती उपळाई, माढा, श्रीमती सोनी प्रभाकर कानडे, शाळा माळशिरस, अमित सुभाष भोरकडे शाळा आसबेवस्ती मंगळवेढा, परवेज मा रफिक शेख शाळा भोसले वस्ती मोहोळ, चंद्रकांत हनुमंत माळी, कोरके वस्ती-२ पंढरपूर, खुशाल्लोद्दीन उस्मान शेख, शाळा सांगोलकर वस्ती सांगोला, श्रीमती शुभांगी सुधाकर पवार, शाळा बिबिदारफळ ता उत्तर सोलापूर, किरण गोवर्धन भांगे शाळा माढा हायस्कूल, माध्यमिक विभाग तर यशवॅत दगडू कांबळे, शाळा इंदिरानगर मंद्रुप, दक्षिण सोलापूर यांनी विशेष पुरस्कार तर शिष्यवृत्ती साठी पुरस्कारा मध्ये अंबाराय रामन्ना उजनी, शाळा सिन्नूर अक्कलकोट, सोमेश्वर रामेश्वर देशमाने, पानगाव -२ बार्शी, श्रीमती राणी महादेव शाळा, वरकरणे ता. करमाळा,अशोक विठ्ठल ढोबळे शाळा मोडनिंब – १, श्रीमती वैशाली प्रकाश भागवत शाळा पिलीव – मुले ता माळशिरस, श्रीमती शोभा तुकारीम कोलते, शाळा भाळवणी ता मंगळवेढा, दत्तात्रय भैरू डोके, शाळा पापरी ता मोहोळ, शरद गोपाळराव बिराजदार, नेमतवाडी ता. पॅढरपूर, श्रीमती स्वाती बाळकृष्ण निळकंठ, एकतपूर ता सांगोला, श्रीमती सरस्वती संभाजी पवार शाळा अकोलेकाटी ता उत्तर सोलापूर, विलास शिवराम गिराम, शाळा संगदरी ता . दक्षिण सोलापूर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले आहेत.
सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व पुरस्कार जाहिर झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!