शैक्षणिकसांगोला तालुका

उत्कर्ष विद्यालयात चिंतन दिन संपन्न

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात स्काऊट- गाईड चळवळीचे जनक लॉर्ड पॉवेल यांचा जन्मदिन दरवर्षी चिंतन दिन म्हणून साजरा करण्यात येतो‌. त्याच्या अनुषंगाने विद्यालयात चिंतन दिन साजरा करण्यात आला.
        प्रारंभी लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी सर ,प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम तसेच पर्यवेक्षक मिसाळ सर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सामुदायिक प्रार्थना म्हणण्यात आली . व स्काऊट -गाईड विषयी माहिती श्री .कब मास्तर चौरे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गोतसूर्य सर यांनी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे मनोरंजन खेळ घेतले तसेच या कार्यक्रमाच्या वेळी वेगवेगळी गाणी ,खेळ घेण्यात आली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कब मास्तर श्री .चौरे सर यांनी केले तर आभार प्लॉक लिडर कडव मॅडम यांनी मानले .यावेळी विद्यालयातील विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!