सांगोला तालुका

पर्यावरण जनजागृती निमित्ताने सांगोला नगरपरिषदेच्यावतीने भव्य सायकल रॅली संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या जल, पृथ्वी, आकाश, अग्नी, वायू या पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 या अभियानात सांगोला नगरपरिषद सहभागी झाली आहे. या अभियानाअंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरातील नागरिकामध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी नगरपरिषदेमार्फत काल मंगळवार दि.17 जानेवारी रोजी सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अभियानाच्या वायु या घटका अंतर्गत पर्यावरण रक्षण हवा प्रदूषण कमी करणे, इंधनाची बचत याबाबत जनजागृती तसेच नागरिकांमध्ये चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी या भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध सामाजिक संघटना, नगरपलिका अधिकारी-कर्मचारी व शहरातील नागरिक. सांगोला विदयामंदीर प्रशालामधील शाळकरी मुले असे साधारण 250 सायकल प्रेमी यावेळी सहभागी झाले होते.
रॅलीची सुरुवात कार्यालयीन अधिक्षक श्री विजयकुमार कन्हेरे यांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात आली. सदर रॅलीची सुरवात सांगोला नगरपरिषद येथून महात्मा फुले चौक ते भोपळे रोड, कडलास नाका, आंबेडकर उदयान, कचेरी रोड मार्गे नगरपरिषद येथे रॅलीचे समारोप करण्यात आला. यानंतर उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली.

सदर रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सांगोला शहर समन्वयक सौ.तेजश्री बगाडे मॅडम,  स्वच्छता निरीक्षक श्री.विनोद सर्वगोड, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक श्री.प्रशांत बनसोडे व विद्यामंदीर प्रशालेचे प्राचार्य भिमाशंकर पैलवान सर, श्री.किरण घोंगडे सर, श्री. सुभाष निंबाळकर सर ,श्री.अश्वजीत माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी लेखापाल श्री जितेंद्र गायकवाड, स्थापत्य अभियंता श्री अमित कोरे, पाणी पुरवठा अभियंता श्री. तुकाराम माने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी  योगेश गंगाधरे , श्री. कृष्णा मोरे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शेवटी अधिकारी, कर्मचारी, नागरीक, शालेय विद्यार्थी यांचे आभार स्वच्छता निरीक्षक श्री.विनोद सर्वगोड यांनी मानले. नागरिकांनी पर्यावरण रक्षण, इंधन बचत व आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी सायकल चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!