सोमवार पासून सांगोला शहराला पूर्ववत एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करावा आमदार शहाजी बापू पाटील यांचे नगरपालिका प्रशासनाला आदेश.

आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उजनी धरणातून सांगोला शहर सांगोला तालुक्यातील शिरभावी पाणीपुरवठा योजना पंढरपूर शहर व सोलापूर शहरासाठी साडेचार टीएमसी पिण्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर जलसंपदा विभागाने मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडले होते हे पाणी शनिवारी सकाळी पंढरपूर बंधाऱ्यामध्ये पोहोचणार आहे त्यामुळे भीमा नदीमध्ये मुबलक पाणी साठा होणार आहे
यावर आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिका प्रशासनाला दोन दिवसांमध्ये व्यवस्थित नियोजन करून येत्या सोमवार दिनांक २५ सप्टेंबर पासून पूर्वीप्रमाणे सांगोला शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत सध्या गणपती उत्सव सुरू असून लवकरच गौरीचेही आगमन होणार आहे या सणासुदीच्या काळामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची थोडीही टंचाई जाणवु न देता शहरांमध्ये पूर्वीप्रमाणे एक दिवसाआड मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आदेश आमदार शहाजीबापू पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत त्याचप्रमाणे शिरभावी पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असणाऱ्या सर्व गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याचेही आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत