कोळा येथील दीपक आबा सायन्स कॉलेजला एनसीसीकडून वाढीव जागाची मान्यता- संस्थापक दिपकराव माने

महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांच्याकडून डॉ पतंगराव कदम बहुद्देशीय शिक्षण संस्था संचलित दिपक आबा साळुंखे पाटील ज्यु.कॉलेज व महाविद्यालय कोळे या महाविद्यालयास ”३८ महाराष्ट्र बटालियन” यांच्याकडून नवीन ५१ जागांची मान्यता मिळाली. मिळाली असल्याचे पत्र एनसीसी करून देण्यात आले आहे एकूण संस्थेला पूर्वीच्या १०६ वाढलेल्या नवीन ५१ अशा एकूण १५७ जागा मिळाले असुन एन.सी.सी चे १ युनिट महाविद्यालयास मंजूर झाले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक दिपकराव माने सचिव अमोल माने मार्गदर्शक बाळासाहेब करांडे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच सोलापूर एनसीसी कडून ग्रामीण भागात एनसीसी विद्यार्थ्यांसाठी कॅम्प कोळ्यासारखे डोंगर परिसरात महाराष्ट्र बटालियन व्यवस्थित चांगल्या प्रकारे कॅम्प पार मदत केल्याने डॉ पतंगराव कदम शिक्षण संस्थेने गोरगरीब एनसीसीच्या मुलांसाठी चांगले काम पाहून संस्थेला वाढीव जागा मिळाल्या आहेत. संस्थापक दीपकराव माने यांनी कोळ्या सारख्या ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अल्पवधीत काळामध्ये शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे ग्रामीण भागात पहिलीच एवढ्या मोठ्या जागांची एनसीसी कडून मान्यता मिळाल्याने एनसीसी वाढीव जागा मिळाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.त्यांच्या कार्याचे कोळा ग्रामस्थातून कौतुक होत आदर्श कार्याबद्दल कोळा पंचक्रोशीतून आनंद व्यक्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होता.