सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला महाविद्यालयात अर्थवेध पोस्टर प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न

सांगोला/प्रतिनिधी : सां. ता. उ. शि. मंडळाचे सांगोला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या
वतीने आयोजित दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी 'अर्थवेध' या पोस्टर प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न
झाला. या पोस्टरचे उद्घाटन डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथील अर्थशास्त्र विभाग
प्रमुख प्राध्यापक प्रा. एस.बी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले हे उपस्थित होते.

प्रा. एस.बी. शिंदे यांनी आपले विचार व्यक्त करताना अर्थवेध या पोस्टर मधून विद्यार्थ्यांमध्ये
नवीन विचार ,कल्पना, चालू आर्थिक व सामाजिक समस्या, संशोधन व विकास वृत्तीला चालना मिळते
असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या पोस्टरमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असेही मत मांडले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना व कौशल्यांना संधी देण्याचा मार्ग म्हणजे 'अर्थवेध' हे पोस्टर आहे
असे विचार मांडले. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्योजकता, नवप्रवर्तन, शोध
व संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अर्थवेध या पोस्टर मध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे
म्हटले. उद्घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पोस्टर सादरीकरणाची स्पर्धा घेण्यात आली.

 

जवळपास सतरा विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबर एन.ए यांनी केले. आभार
प्रदर्शन प्रा. पी.डी गोडसे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एम.डी.
वेदपाठक यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सौ.भूंजे एस. एस. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी
होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य
लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!