सांगोला विद्यामंदिरमध्ये ‘श्री’ ची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या थाटामाटात, उत्साहात ‘श्री ‘ची प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी दरवर्षीप्रमाणे नरेंद्र होनराव यांचे कडून श्री ची मूर्ती देण्यात आली.

सुरुवातीला झपके वाड्यामध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कार्यकारणी सदस्य, विश्वेश झपके यांच्या हस्ते ‘श्री’ ची विधिवत पूजा संपन्न झाली. यावेळी संस्थाअध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था सदस्य प्रफुल्लचंद्र झपके,चंद्रशेखर अंकलगी, प्रसाद झपके, झपके कुटुंबीय, प्राचार्य गंगाधर घोंगडे,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर वाजत- गाजत गणपतीची मिरवणूक सांगोला विद्यामंदिर येथे आली व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांच्या हस्ते पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मयांक झपके यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यावेळी टिपरी नृत्य, लेझीम व देखावा याचे बहारदार सादरीकरण झाले व गणपतीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्था सचिव म .शं.घोंगडे, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभिषण माने , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाची सुरुवात पहिले पुष्प ‘प्रतिष्ठापना’ हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील गणेश उत्सव समिती, सांस्कृतिक विभाग, उत्सव विभाग, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
सांगोला विद्यामंदिर सांगोला गणेशोत्सव मिरवणूक सांगोला विद्यामंदिर- वाढेगाव नाका- झपकेवाडा- देशपांडे नाकील चौक – कोष्टी गल्ली- मणेरी चौक – मारुती मंदिर- जय भवानी चौक- तहसील कार्यालय व सांगोला विद्यामंदिर अशी संपन्न झाली. यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी- विद्यार्थिनी,एनसीसी विद्यार्थी, स्काऊट गाईड यांचा सहभाग होता. घोषणा देत मार्गस्थ झालेली मिरवणूक व ठिकठिकाणी टिपरी नृत्य,लेझीम व देखावा याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.