महाराष्ट्र
प्रशांत गवळी यांना पीएचडी प्रदान

पंढरपूर: प्रशांतकुमार मारुतीराव गवळी (सांगोला)यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीरिंग या विभागातून शिवाजी विद्यापीठाची पी. एच. डी. (डॉक्टरेट) पदवी मिळाली. त्यांनी “डिजाइन एंड डेव्हलपमेंट ऑफ मॉडल फॉर सेंटीमेंट एनालिसिस ” या विषयात शोध निबंध सादर केला. त्यांना डॉ. एस. के. शिरगावे, मारुती गवळी जयश्री गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.
ते सध्या डीकेटीई सोसायटीच्या टेक्सटाइल एंड इंजीनियरिंग इंस्टीट्यूट, इचलकरंजी येथे प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, डी. के.टी. ई. संस्थेचे चेअरमन मा. श्री. कल्लाप्पाण्णा आवाडे व डायरेक्टर डॉ. सौ. आडमुठे,प्रदीप गवळी, प्रियांका गवळी, विलास सुरवसे, प्रशांत वाघमारे यांनी अभिनंदन केले आहे.