सांगोला तालुकाक्राईममहाराष्ट्र

वाकी शिवणे येथे चोरी; 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास

सांगोला(प्रतिनिधी):- अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 42 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली असल्याची घटना 14 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास वाकी शिवणे ता.सांगोला येथे घडली. चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीच्या अर्धा ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, 5 ग्रॅम चे दोन सोन्याचे कानातील झुबे, 7.5 ग्रॅमची सोन्याची बोरमाळ व रोख 12,500/ रुपये लंपास केले आहेत.चोरीची फिर्याद किशोर गुरव (रा. वाकिशिवणे ता. सांगोला ) यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक दि.14 मार्च रोजी रात्री 11 वा.चे सुमारास फिर्यादी व पत्नी शुभांगी हे दोघेजन उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराचा दरवाजा पुढे करून घरासमोरील कट्ट्यावर झोपले होते. त्यानंतर दिनांक 15 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वा. चे सुमारास झोपेतून उठुन घरात गेल्यावर घरातील गोदरेज चे कपाट उघडे दिसले, तसेच आजुबाजूला कपाटातील कपडे खाली अस्ताव्यस्त पडलेली होती त्यामुळे कपाटाच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन व रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!