सांगोला तालुकाराजकीय

मतदान केंद्रावर मतदानासाठी येणे शक्य नाही अशा मतदारांना होम वोटिंग सुविधा देण्यात येणार-अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे

लोकसभा निवडणुक पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात

सांगोला(प्रतिनिधी):- 85 वर्षावरील मतदार पुरुष 1796 स्त्रिया 2538 एकूण 4334 आहेत. तसेच अपंग मतदार 1818 पुरुष व स्त्रिया 1056 एकूण 2874 मतदार असून ज्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येणे शक्य नाही अशा मतदारांना होम वोटिंग सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी 20 पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. आदर्श मतदान केंद्रे 2 असून सांगोला शहर मतदान केंद्र क्रमांक 160 व कडलास मतदान केंद्र क्रमांक 191 निश्चित केलेले आहेत. त्या मध्ये पिंक पोलींग स्टेशन महिलांसाठी 2 सांगोला शहरातील मतदान केंद्र क्रमांक 154 व 168 हि निश्चित करणेत आलेली आहेत. अपंग मतदान केंद्र वाकी शिवणे मतदान केंद्र क्रमांक 82 हे निश्चित करणेत आलेले आहे. पडदानशील मतदान केंद्र सांगोला शहरातील मतदान केंद्र क्रमांक 147 निश्चित करणेत आलेले आहे. युवा मतदान केंद्र मेटकरवाडी-घेरडी मतदान केंद्र क्रमांक 247 व गुणाप्पावाडी मतदान केंद्र क्रमांक 295 मतदान केंद्र निश्चित करणेत आली असल्याची माहिती अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मा. श्री. संतोष कणसे अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, 43 माडा लोकसभा मतदार संघ तथा तहसिलदार सांगोला यांनी 253 सांगोला विधानसभा मतदार संघातील सर्व प्रेस मिडिया व प्रिंटींग प्रेस प्रोप्रा. यांची सभा दिनांक 18 मार्च 2024 रोजी तहसिल कार्यालय सांगोला येथे सहविचार सभा आयोजीत करण्यात आली होती.
पुढे बोलताना अति. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार श्री. संतोष कणसे म्हणाले, 253 सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 299 मतदान केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे 299 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, 27 बी.एल.ओ. पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.आज मितीस 162729 पुरुष व 147795 स्त्री, 2 इतर असे एकूण 310526 मतदार आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी 34 (4 राखीव) भरारी पथक 4 (राखीव 1), स्थिर पथक 3 (3 राखीव), व्हिडीओ पहाणी पथक 2, व्हिडीओ सर्वेक्षण पथक 5 तसेच समन्वय अधिकारी म्हणून 17 नोडल अधिकारी यांची नेमणूक करणेत आली आहे. क्षेत्रीय अधिकारी यांच्या नेमून दिलेल्या गावामध्ये तीन संयुक्त भेटी झालेल्या असून त्याबाबतचे अहवाल कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. तसेच यापूर्वी सर्व मतदान केंद्रांची एएमएफ सुविधा बाबतची तपासणी पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी यांचेकडून करून घेण्यात आली असलेबाबत सांगितले.

 

16 मार्च 2024 रोजी आदर्श आचार संहिता जाहीर झाले पासून 253 सांगोला विधानसभा मतदार संघातील गर्व राजकीय पक्षांचे भित्तीपत्रके, घोषवाक्ये, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे तातडीने यंत्रणे मार्फत हटविण्याचे काम चालू आहे. नियंत्रण कक्ष, आचार संहिता कक्ष, सिव्हीजील कक्ष स्थापन करणेत आलेला असून याचा संपर्क क्रमांक 02187- 220218 असा आहे. मतदार जनजागृती करिता स्वीप कार्यक्रम सुरु आहे. 16 मार्च 2024 पासून मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळणे बंद असून नव नोंदणी सुरु राहणार आहे. मिडिया समन्वय अधिकारी म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. मिलिंद सावंत मो.नं. 8275207912 असा आहे. 253 सांगोला विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक कामी अधिकारी कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला असून प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे.सदरचे संपूर्ण कामकाज हे श्रीम. मोनिका सिंह, निवडणूक निर्णय अधिकारी 43, माढा लोकसभा मतदार संघ व मा. श्री. बी.आर.माळी, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, 43 माढा लोकसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली चालणार आहे.

आदर्श आचार संहिता दिनांक 16 मार्च 2024 रोजी पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेली आहे. माढा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक तिसर्‍या टप्प्यात असून 12 एप्रिल 2024 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणेत येणार असून नामनिर्देशन 19 एप्रिल 2024 पर्यंत, मतदानाचा दिनांक 07 मे 2024 व मतमोजणी दिनांक 04 जून 2024 रोजी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!