नेट बॉल स्पर्धेत नाझरा विद्यामंदिर जिल्ह्यात प्रथम

नाझरा(वार्ताहार):- सोलापूर येथील रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर या ठिकाणी 17 वर्ष वयोगटातील शालेय जिल्हास्तरीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या संघाने बहारदार खेळ करत अजिंक्यपद पटकावले.
दोन्ही गटात खेळाडूंनी अतिशय आक्रमक असा खेळ करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली व प्रथम क्रमांक मिळवला या दोन्ही संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक स्वप्निल सासणे यांचे मार्गदर्शन लाभले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, सर्व शिक्षक, क्रीडाप्रेमी पालकांनी खेळाडूंच्या यशाबद्दल अभिनंदन केले. त्याचबरोबर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.