सांगोला महाविद्यालयाच्या निरज महानवारला गोल्ड मेडल

महामहीम राज्यपाल कार्यालयाकडून आयोजित २५ वा क्रीडा महोत्सव २०२३-२४ संत तुकडोजी
महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे आयोजित करणेत आला होता या क्रीडा महोत्सवात आंतर विद्यापीठ
मैदानी स्पर्धेत सांगोला महाविद्यालयाच्या निरज महानवार याने सोलापूर विद्यापीठाकडून प्रतिनिधित्व
करताना भाला फेक या प्रकारात सोलापूर विद्यापीठाला गोल्ड मेडल मिळवून देले.
त्याच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल संथेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष तात्यासाहेब केदार, व प्रा.पी.सी. झपके,
खजिनदार मा. श्री. नागेश गुळमिरे, सचिव म.सी. झिरपे, सहसचिव साहेबराव ढेकळे व इतर संस्था
पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. तसेच सचिव म.सी. झिरपे व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले
यांनी निरज महानवारचा सत्कार करून अभिनंदन केले. खेळाडूंना प्र.प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, शारीरिक
शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण, व जिमखाना कमिटीचे सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. सत्कार
कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक पी.एस.शिंदे, सर्व प्रशासकीय सेवक, उपस्थित होते.