महाराष्ट्र

संकेत ठोंबरे याना पलपब साहित्य भूषण पुरस्कार जाहीर

सांगोला येथील चैतन्य सांगित विद्यालयातील संगित साधक व विद्यार्थी व उत्कर्ष विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संकेत ठोंबरे याना पलपब साहित्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे..

पुस्तकांचे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर ,दहावा मैल मुंबई आग्रा हायवे नाशिक या ठिकाणी सदर पुरस्कार वितरण सोहळा 10 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.या साहित्यिक सोहळ्यात काव्यसमेलन व नविन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.

संकेत ठोंबरे यानी लिहिलेल्या तबल्याच्या रचनांची उगमस्थाने या पुस्तकाचे नुकतेच सांगोला येथे प्रकाशन झाले आहे.वयाच्या तिशित तबला शिकणार्या विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन करणारे संगित विषयक पुस्तक दिल्याबद्दल हा साहित्य भूषण पुरस्कार दिला जाणार असल्याचे पलपब पब्लिकेशनच्या कार्यकारी अधिकारी लीना पाटील यानी सांगितले.याचे संपूर्ण श्रेय चैतन्य सांगित विद्यालयाचे संचालक प्रसाद पाटील सर व माता- बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेस असल्याचे संकेत ठोंबरे यानी  सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button