चोपडी गावचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भारत यादव यांचे निधन

नाझरा(वार्ताहर) : -सांगोला तालुक्यातील चोपडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष, जाणीव ग्रुपचे आधारस्तंभ भारत आनंदा यादव यांचे गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम यादवमळा येथील स्मशानभूमीत सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आला.
निधनासमयी त्यांचे वय 54 वर्ष होते. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, 2 मुले, 2 भाऊ,भावजया, मुले, असा मोठा परिवार आहे. चोपडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच पोपटशेठ यादव, राजू यादव यांचे ते थोरले बंधू होत. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता यादवमळा स्मशानभूमी येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.