उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

उत्कर्ष प्राथमिक विद्यालयाची इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांची पन्हाळा गड व शाहू पॅलेस येथे सहल गेली होती. पाठ्यपुस्तकातील इतिहास व गड किल्ले यांची प्रत्यक्ष माहिती मुलांना व्हावी म्हणून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम मुलांना पन्हाळा गड पाहण्यासाठी घेऊन गेलो होतो. तेथील उपस्थित गाईडने इतिहासातील पन्हाळगडाचे महत्व सांगितले. तसेच गडावरील सज्जा कोटी ,अंबरखाना, तीन दरवाजे यांच्या विषयी माहिती दिली.
पन्हाळगड पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यासमोर इतिहास उभा राहिला. त्यानंतर कोल्हापूरला शाहू पॅलेस पाहण्यासाठी दुपारी सहल गेली तेथे मुलांनी शाहू महाराजांचे साहित्य, शस्त्र, त्यांच्या वापरलेल्या वस्तू, वेगवेगळे प्राणी पाहिले ते पाहताना मुलांना खूप कुतूहल वाटत होते. तसेच मुलांना तेथे नाष्टा देण्यात आला. त्यानंतर परत निघालो. मुलांनी गाडीमध्ये गाण्यांच्या भेंड्या, नावाच्या भेंड्या, कोडे सांगणे, गाण्यांवर नृत्य करून खूप मजा केली. त्यानंतर रात्रीच्या जेवणाचा मुलांनी आस्वाद घेतला .
दिवसभरातील मौज मजा आनंदाचे क्षण हृदयात साठवून परत निघालो .सहल यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई आणि उपमुख्याध्यापिका स्वराली ताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तसेच सहलीसाठी मुख्याध्यापिका मागाडे बाई ,शेळके सर, माळी बाई ,रसाळ बाई, सुरेखा ताई , देशपांडे बाई ,भाकरे बाई, भोसले बाई ,होनराव बाई ,निराळे मावशी हे सर्वजण गेले होते.