जाणता राजा तरुण गणेश मंडळाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद-आ.शहाजीबापू पाटील
जाणता राजा तरुण गणेश मंडळाच्या रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्यांचे रक्तदान

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला शहरातील जाणता राजा तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर आयोजीत करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गणेशोत्सवानिमित्त सांगोला तालुक्यातील सर्व मंडळापुढे जाणता राजा तरुण गणेश मंडळाने आदर्श निर्माण केला असल्याची प्रतिपादन आ.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला.
सांगोला शहरातील सहारानगर एखतपूर रोड येथील जाणता राजा तरुण गणेश मंडळाकडून सोमवार दि.9 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 40 पुुरुष व 10 महिला अशा एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. या रक्तदान शिबीराप्रसंगी आ.शहाजीबापू पाटील व युवा नेते यशराजे साळुंखे-पाटील यांनी भेट दिली.
रक्तदान शिबीराप्रसंगी अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी रक्तसंकलनाचे काम केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी जहाँगिर इनामदार गुरुजी, भारत शिवशरण, संतोष लेंडवे, उत्तम सरगर, अण्णा पवार, प्रदिप खाटपे, प्रमोद कोठावळे, रणजित बगले, संदिप माने, गणेश चव्हाण, सुजित जोशी, राहुल चांडोले, संजय लाटणे, तुकाराम माने, अॅड.आयुब पटेल, दादासो चव्हाण, पारस डांगे, बाळकृष्ण चांडोले, अक्षय शिर्के, नवनाथ लेंडवे, प्रेम पवार, ओंकार पवार, पोपट शिर्के, संतोष गोंंजारी, राहुल दिवटे, प्रकाश माने, गौरव माने यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.