नंदेश्वर (प्रतिनिधी)- मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे पश्चिम महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला व गावागावात जत्रेत-यात्रेत किंवा विविध कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस ठरलेला तसेच विविध पुरस्काराने सन्मानित असलेला कोल्हापूर येथील सुभाष हिलगे निर्मित वैभव डान्स म्युझिकल या कार्यक्रमाचे आयोजन नंदेश्वर येथील श्री माऊली गणेशोत्सव मंडळाने रौप्यमहोत्सवानिमित्त बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक सात वाजता चावडी कट्ट्यासमोर करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पिंटू बंडगर व उपाध्यक्ष शिवशंकर चौंडे यांनी दिली.
सदर कार्यक्रम हा मनोरंजनात्मक असुन दैनंदिन जीवन जगत असताना तणावपूर्ण वातावरणातुन बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून अश्या कार्यक्रमांचे आयोजन मंडळाने केलेले आहे.
अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही ना काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतच्या मनोरंजनाचा संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभवला आहे.
त्याचबरोबर श्री माऊली गणेशोत्सव मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही केले असून त्यामध्ये अन्नदान करणे,गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे,गुणवंत विद्यार्थ्यांचा व यशस्वी व्यक्तींचा सत्कार करणे व लहान मुलांच्या साहसी व मनोरंजनात्मक खेळांचे कार्यक्रम राबवणे या आणि अश्या प्रकारच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. तरी या कार्यक्रमासाठी नंदेश्वर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री माऊली गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पिंटू बंडगर व उपाध्यक्ष शिवशंकर चौंडे यांनी केले आहे.