गणेशोत्सवानिमित्त उत्कर्ष विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

उत्कर्ष प्राथमिक विद्यालयांमध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 9 सप्टेंबर 2024, वार सोमवार रोजी इयत्ता पहिली व दुसरी साठी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये मुलांनी आकर्षक रंगाने चित्र रंगवले. तसेच तिसरी व चौथी साठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे.( हस्तकला स्पर्धा) त्यामध्ये मुलांनी टाकाऊ वस्तु चा उपयोग करून उपयोगी वस्तू तयार केल्या. दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी इयत्ता पहिलीचा विक्री केंद्राचा दुर्वा विकणे हा उपक्रम घेण्यात आला.
त्यामध्ये मुलांनी दूर्वा, जास्वंद व आघाडा घालून पेंडी तयार केली व त्याची शालेय प्रशालेत पालकांना विक्री केली. तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यास विषय अंतर्गत अन्नधान्य व त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ याचा प्रकल्प मांडला. त्यामध्ये ज्वारी ,गहू ,तांदूळ, हरभरा व मका यापासून विविध पदार्थ तयार करून आणले. तसेच तिसरीने नाटुकले सादर केले. अशा प्रकारे गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.