sangola
कमलापूर येथील ऊसतोड मुकादम आनंदा बंडगर यांचे निधन
कमलापूर येथील ऊसतोड मुकादम आनंदा गणू बंडगर यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 70 होते. ते प्रसिद्ध ऊसतोड मुकादम होते.गेले 50 ते 55 वर्ष कोल्हापूर शिरोळ कागल घाटनांद्रे कर्नाटकातील काही भाग सांगली जिल्ह्यातील काही भाग विविध साखर कारखान्यावर ऊस मजूर पुरवण्याचे प्रामाणिक काम केले.
अनेक लोकांना वेळोवेळी प्रपंचाला हातभार लावण्याचे काम केले. नेहमी ऊसतोड कामगारांच्या प्रति आदरभाव होता. त्यांच्या निधनाने कमलापूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून नातवंडे, त्यांचे भाऊ व बहिणी,पुतणे, असा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जनाचा तिसरा दिवस शुक्रवार दिनांक 22/09/2023 रोजी सकाळी ठीक ७ वाजता कमलापूर स्मशानभूमी मध्ये होणार आहे.