कडलास गावातील आलदर तलाव येथे टेंभू योजनेतून सोडलेल्या पाण्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते पाणीपूजन

पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सध्या सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे शेतीच्या पाण्याचे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे परवाच्या दिवशी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला शहरातील व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्याकरता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करून उजनी धरणातील पाणी पिण्यासाठी सोडले आहे त्याचबरोबर टेंभू उपसा सिंचन योजनेचे नीरा उजवा कालव्याचे व म्हैशाळ योजनेचे सध्या आवर्तन चालू असून यामधून शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाणी पोहोचण्याकरता आमदार शहाजी बापू पाटील सर्व योजनांचे आवर्तन यशस्वीरित्या पूर्ण करण्याकरता परिश्रम घेत आहेत चालू टेंभू योजनेच्या आवर्तनातून कडलास गावातील आलदर तलाव आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नातून भरून देण्यात आला आहे या तलावात पाणी सोडल्यामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहापोटी आमदार शहाजी बापू पाटील यांनी तलावातील सोडलेल्या पाण्याचे पूजन केले
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव भाऊ गायकवाड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिहं केदार, तानाजी काका पाटील, सुनील पवार, विजय बाबर, यांच्यासह शेतकरी महिला भगिनी उपस्थित होत्या.