वझरे येथे रब्बी ज्वारी बियाणे वाटप

वझरे ता सांगोला येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य व राष्ट्रीय कृषी विकास योजना मिशन सन 2023- 24 अंतर्गत रब्बी ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी कृषी सहाय्यक संतोष खांडेकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले यावेळी सरपंच संजय कोकरे वसंत पाटील माजी सरपंच अशोक पाटील अंकुश पाटील राजू पाटील आबा पवार सुरेश रेड्डी संजय रेड्डी शरद गुरव यशवंत खरात शिवपुत्र पाटील व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते