डोंगरगांव येथे राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

सांगोला (प्रतिनिधी) :- :- सांगोला तालुक्यातील डोंगरगांव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरगांव यांच्या वतीने सोमवार दि. २५/०९/२०२३ रोजी सायं. ७ वा. च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक, डोंगरगांव याठिकाणी भव्य असे राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
डोंगरगांव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दरवर्षी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असते. त्याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरगांव यांच्या वतीने यावर्षी सांस्कृतिक कलागुणांना वाव देणेसाठी व कलाकारांना प्रोत्साहन देणेसाठी यावर्षी भव्य अशा राज्यस्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धा ही ग्रुप डान्स व वैयक्तिक डान्स अशा दोन विभागामध्ये विभागण्यात आलेली असून ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या संघाला ११,१११/- (अकरा हजार एकशे अकरा रु)चे रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात येणार असून द्वितीय संघाला ७,७७७/- (सात हजार सातशे सत्त्याहत्तर) चे रोख बक्षिस व ट्रॉफी तर तृतीय संघाला ५,५५५/- ( पाच हजार पाचशे पंचावन्न) चे रोख बक्षिस व ट्रॉफी आणि उत्तेजनार्थ संघासाठी २,२२२/- (दोन हजार दोनशे बावीस) चे रोख बक्षिस असून वैयक्तिक डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास ५,०००/- (पाच हजार रुपये) चे रोख बक्षिस व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास ३,०००/- (तीन हजार रुपये) चे रोख बक्षिस व ट्रॉफी, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास २,०००/- (दोन हजार रुपये) चे रोख बक्षिस व ट्रॉफी, उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास १,०००/-(एक हजार रुपये)चे रोख बक्षिस असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली असून सदर स्पर्धा ही राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळे जिल्ह्यातील व तालुक्यातील जास्तीत जास्त संघांनी व स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेवून आपल्या कलेचे प्रदर्शन करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
नाव नोंदणीसाठी विक्रम किरगत (९७३०६१४३८६), सागर बाबर (८९७५२१२०१३), दादासो बाबर (९७६५२२२९५०), यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आलेले आहे.