रोटरी क्लबच्या वतीने पुरस्कार प्राप्त सभासदांचा सत्कार संपन्न..

रोटरी क्लब सांगोलाचे अनेक सभासदांना इतर सामाजिक संस्थांकडून चांगल्या कामासाठी गौरवण्यात येते. अशावेळी आपल्या सभासदांचा रोटरी सुद्धा पुन्हा एकदा सन्मान करते ही रोटरीची परंपरा आहे. रोटरीचे सभासद डॉ. प्रभाकर माळी. श्री.वैजनाथ घोंगडे काका. डॉ. शिवाजी ढोबळे. सौ रत्नप्रभाताई माळी. डॉ. शिवराज भोसले यांच्या सुविद्य पत्नी डॉ. स्नेहल भोसले या सर्वांना भाई गणपतराव देशमुख सांगोला भूषण पुरस्कार मिळाला.
श्री बाळासाहेब नकाते यांना उत्कृष्ट अभियान अभियंता हा जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला. आमचे रो.डॉ. रमेश बुगड सर यांच्या सुविद्य पत्नी सौ. बुगड मॅडम यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला. रो.हमीद शेख यांना डिस्ट्रिक्ट मध्ये बेस्ट डायरेक्टर म्हणून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले व आमचे मित्र रो. रामचंद्र उर्फ मनोज ढोबळे यांच्या सुविद्य पत्नी सौ नीता ढोबळे यांना हॉटेल व्यवसायात उत्तुंग यश मिळवल्याबद्दल लोकमत समूहाने त्याची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव केला या सर्वांचा यथोचित सन्मान रोटरी क्लब ने केला.
त्यावेळी रो. दीपक चोथे अध्यक्ष साजिकराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तर सत्काराला उत्तर देताना डॉ. स्नेहल भोसले मॅडम व सौ बुगड मॅडम यांनी रोटरीचे धन्यवाद व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.हा सर्व कार्यक्रम रो.इंजिनियर मधुकर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात व सर्व रोटरी परिवाराच्या साक्षीने त्यांच्या घरी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मधुकर नाना यांचे विशेष सहकार्य लाभले.