स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना वंदन करण्यासाठी मेरी माटी, मेरा देश अभियान – चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला: स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी मेरी माटी, मेरा देश अभियान राबविले जात आहे. मेरी माटी, मेरा देश या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांतून, शहरातून मातीचे संकलन करण्यात येणार आहे. या संकलित केलेल्या मातीपासून दिल्ली येथे अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. ही अमृत वाटिका एक भारत, श्रेष्ठ भारत याचे प्रतीक असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंचप्रणमध्ये सांगितल्यानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करूयात असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेरी माटी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या वीर माता, वीर पत्नी आणि माजी सैनिक यांच्या उपस्थित स्वातंत्रवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती अमृत कलशात भरून वीरांना वंदन केले. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले की, प्रत्येक भारतीयाने देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकजुट दाखवण्यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे, अशी पंचप्राण शपथ असलेला भारत पुढील काही वर्षात घडवायचा आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अभियान राबवण्यात येत आहे. दिल्लीत अमृत वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती घेऊन अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून माती संकलित करून दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. या संकलित करण्यात आलेल्या मातीतून अमृत वाटिकेची निर्मिती करण्यात येणार असून ही अमृत वाटिका एक भारत, श्रेष्ठ भारत याचे प्रतीक असेल असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, यशवंत भोसले, अनिल कांबळे, वसंत सुपेकर, आनंद फाटे, दिलीप सावंत, दुर्योधन हिप्परकर, विजय बाबर, संजय गंभीरे, मानस कमलापुरकर, परेश खंडागळे, शिवाजी ठोकळे, विजय ननवरे, गणेश कदम, प्रवीण जानकर, विशाल कुलकर्णी, मोहन बजबळे, संजय केदार, विश्वास कारंडे, बिरा मेटकरी, संजय गव्हाणे, दीपक केदार वीरमाता हिराबाई गायकवाड, तारुबई दुरुकुळे, माजी सैनिक नरेश बाबर,उत्तम चौगुले, रामहरी नलावडे, केशव लेंडवे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.