महाराष्ट्र

श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.करखान्याच्या साखर प्रकल्पाच्या प्रस्तावित विस्तारीकरण कामाच्या भांडवली खर्चास मंजुरी घेण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात गळीत झालेल्या उसाला अंतिम २५११ रु दर जाहिर केला आहे आपण एफआरपी पेक्षा १३५ रू अधिक दर देणार असुन दिवाळीमध्ये उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन मा श्री आ रणजितसिंह मोहीते पाटील यांनी बोलताना सांगितले .

 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलींद कुलकर्णी यांनी केले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या सभेस माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहीते पाटील,सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहीते पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहीते पाटील, आ राम सातपुते,शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशिल मोहीते पाटील,संचालक बाबाराजे देशमुख,अर्जुनसिंह मोहीते पाटील,मामासाहेब पांढरे,शंकरराव माने देशमुख,सुभेदार अप्पा काळे,यांच्यासह सभासद शेतकरी,व्यापारी,ग्रामस्थ,कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी वर्ग उपस्थित होता.आभार संचालक दत्तात्रय रणवरे यांनी मांडले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!