सन्मित्र गणेश तरुण मंडळाच्यावतीने तालुकास्तरीय वैयक्तिक खुल्या डान्स स्पर्धेचे आयोजन

सांगोला(प्रतिनिधी):- सन्मित्र गणेश तरुण मंडळाच्यावतीने रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता एखतपूर रोड, मस्के कॉलनी, सांगोला येथे तालुकास्तरीय वैयक्तिक खुल्या डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी अमोल नवले व गुरुप्रसाद ढेरे यांचेकडून 5001/- रुपये, व्दितीय क्रमांकासाठी नंदकिशोर इंगळे यांचेकडून 3001/- तर तृतीय क्रमांकासाठी दिव्यांश प्रशांत घाडगे यांचेकडून 2001 रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी परिक्षकांचा निर्णय अंतिम राहिल, सर्व स्पर्धकांनी वेळेवर हजर रहावे., सर्व स्पर्धकांनी आपल्या गिताची सी. डी. युएसबी, पेनड्रव्ह स्वतः घेवून यावे, सर्व स्पर्धकांनी नांव नोंदणी वेळेत करुन घ्यावी, स्पर्धकांच्या जाण्या-येण्याची खर्च व जबाबदारी स्वतःची राहिल व स्पर्धकांचा क्रम नांव नोंदणी प्रमाणे राहील.अशा नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत.
नांव नोंदणीसाठी श्री. संदिप गिड्डे 9561220825, श्री. विशाल कांबळे 9766140041, श्री. ओंकार सपाटे 9823553607 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सन्मिन्न गणेश तरुण मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.