आमदार गोपीचंद पडळकरांच्या समर्थनार्थ धनगर समाज बांधव आक्रमक ; सांगोला येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

सांगोला(प्रतिनिधी):-भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन, फोटोला काळे फासणे, रास्ता रोको आंदोलन करत होते. परंतु आता मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते व धनगर समाज आक्रमक झाला असून लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस सांगोला तालुका धनगर समाज बांधवांकडून सांगोला येथे काल रविवार दि.24 सप्टेंबर रोजी दुग्धाभिषेक घालण्यात आला.
सांगोला तालुका धनगर समाज बांधवांकडून आ.गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ दुग्धाभिषेक करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूधाने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले, असं यावेळी आ.गोपीचंद पडळकर समर्थकांनी नमूद केलं. आ.गोपीचंद पडळकरांच्या समर्थनात एकच छंद गोपीचंद, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी बिरुदेव शिंगाडे, बाळासाहेब एरंडे, दत्तात्रय जानकर, उल्हास धायगुडे, अजित गावडे, विष्णू देशमुख, अमोल खरात, बंडू मासाळ, समाधान नरुटे, काशिलिंग गाडेकर, बबलू पडुळे, सौरभ मेटकरी, प्रविण गावडे, अमित गावडे, विशाल जानकर, सोनू जानकर, योगेश देवकुळे, दत्ता येडगे, दादासाहेब बुरुंगले, काशिलिंग शेंबडे, मारुती बुरुंगले, संतोष बुरुंगले, भारत कारंडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.