संगेवाडी येथील आदर्श गणेशोत्सव तरुण मंडळाचा रक्तदान शिबिराचा आदर्श उपक्रम

सांगोला : गणेशोत्सवात अनेक सार्वजनिक मंडळे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत असतात. संगेवाडी (ता. सांगोला) येथील आदर्श गणेशोत्सव तरुण मंडळाने अनावश्य कार्यक्रमाच्या खर्चांना फाटा देत रक्तदान शिबिराचा आदर्शवत असा उपक्रम राबविला आहे. या रक्तदान शिबिरामध्ये महिलांनाही सहभाग घेतला होता.
सांगोला शहर व तालुक्यात विविध गणेश मंडळाकडून अनेक कार्यक्रम सध्या राबवली जात आहेत. संगेवाडी (ता. सांगोला) येथील आदर्श गणेशोत्सव तरुण मंडळाने यावर्षी आपल्या अनावश्यक खर्चाला फाटा देत गणेशमूर्ती समोरच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मंडळातील सदस्यांबरोबर येथील महिलांनीही या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. ह्या रक्तदान शिबिरामध्ये 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या समाज उपयोगी रक्तदान शिबिर कार्यक्रमास पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, शहाजी नलवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गिरीश गंगथडे, बाळासाहेब भूसे, बाळासो खंडागळे यांनी भेट दिली.