धर्मपूरी—शिदेवाडी रस्ता मृत्यूचा सापळा

नातेपुते प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी भीमनगर—धर्मपुरी ते गुरवकीचा पूल गुरसाळे साधारण (८ किलोमीटर) रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा रस्त्याच्या अवस्थेमुळे प्रवाशांना खड्डे चुकवण्याची कसरत करत प्रवास करावा लागत आहे.
जिल्ह्याच्या टोकावर असलेले शिंदेवाडी हे गाव प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते याच गावात रयत शिक्षण संस्थेची बारावीपर्यंत हनुमान विद्यालय नावाची नामांकित शाळा असून या भागातील पंचक्रोशीतील मुले शिंदेवाडी ला शाळेसाठी सदर रस्त्याने येत असतात बारामतीलाही शिंदेवाडी वरून रोज अनेक चाकरमानी तसेच व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात वाहनाद्वारे येणे जाणे होत आहे सदर रस्त्यावर खड्ड्यांची चाळण झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याने या या रस्त्याची खड्डे बुजवण्याची मलमपट्टी न होता नवीन डांबरीकरण लवकर लवकर होण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी प्रवाशाकडून मागणी होत आहे
धर्मपूरी —शिदेवाडी या रस्तावरील पावसाळ्यानंतर फक्त खड्डे भरून घेतले जातील,या रस्ताच्या डांबरीकरणासाठी बजेट मंजूर नाही लक्ष्मण डाके,उपअभिता सार्व.बांधकाम विभाग ,अकलूज